Header Ads

Header ADS

तेंगसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराचे प्रस्ताव 20 जून पर्यंत स्विकारणार

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या युवा क्रिडा मंत्रालयामार्फत तेंगसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी उपक्रमाचे पुरस्कार खेळाडूंना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.

या राष्ट्रीय साहसी युवा क्रिडा पुरस्कारासाठी खेळाडूंनी आपले प्रस्ताव 20 जून पर्यंत http://dbtyas-youth.gov.in या पोर्टवर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहे. तरी इच्छिुक खेळाडूंनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 26 जून पर्यंत प्रस्ताव स्विकारणार

केंद्र शासनाच्या युवा क्रिडा मंत्रालयामार्फत सन 2017-18 व 2018-19 या वर्षांचे राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली.

या राष्ट्रीय युवा क्रिडा पुरस्कारासाठी खेळाडूंनी आपले प्रस्ताव 26 जून पर्यंत http://innovate.in/national-youth-awards-2018http://innovate.in/national-youth-awards-2019 या पोर्टवर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहे. तरी इच्छिुक खेळाडूंनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments