शहरात 969 नागरीकांचे लसीकरण60 वर्षावरील कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा 551 नागरीकांना पहिला व 418 नागरीकांना दुसरा डोस
कोल्हापूर ता.08 : शहरामध्ये मंगळवारी 8 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पीटलमध्ये 60 वर्षावरील 551 नागरीकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस व 418 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून 969 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे 109, फिरंगाई येथे 111, राजारामपूरी येथे 69, महाडीक माळ येथे 228, आयसोलेशन येथे 60, फुलेवाडी येथे 63, सदरबाजार येथे 74, सिध्दार्थनगर येथे 47 व सीपीआर हॉस्पीटल येथे 208 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 120115 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 41908 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आज अखेर 45 वर्षावरील 52 टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हिशिल्डच्या दुस-या डोस घेण्यासाठी ज्यांचे 84 दिवस पुर्ण झालेले आहेत अशा नागरीकांनी दि.9 जून 2021 रोजी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरीता पात्र लाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोव्हिशिल्डच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे.
No comments