साहेब, आम्ही ग्रामपंचायतीच्या नोकरीवरचं समाधान मानायचं काय आरोग्य भरतीसाठी प्रमाणपत्राची अट रद्द करण्यासाठी आरोग्य मंत्री यांना साकडे
प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी. ग्रामस्तरावरील शासनाच्या विकास कामातील दुवा म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी होय. शासनाची कोणतीही योजना आली तरी प्रामाणिकपणे काम करून गावाची सेवा बजावण्यात ग्रामपंचायत कर्मचारी याचा मोलाचा वाटा आहे. शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद नोकरीत 10 % आरक्षण देण्यात आले. या भरतीसाठी ग्रामपंचायती मध्ये 10 वर्षे नोकरीची अट घालण्यात आली.तर वयाची अट 45 वर्षापर्यंत करण्यात आली.या 10 % आरक्षणामुळे आतापर्यंत अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याचा लाभ झालाआहे . सध्या जिल्हा परिषद मार्फत आरोग्य विभागात नोकर भरती सुरु आहे.या नोकर भरतीत आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी पदांवर 10% ग्रामपंचायत कर्मचारी फवारणी प्रमाणपत्र अट शिथिल करणे बाबत महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग परिपत्रक परिपत्रक क्रमांक2004/ प्र.क्र. 26/ प.रा.: 5 दिनांक 18 ऑक्टोंबर 2005 ने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां करिता वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार 10 % आरक्षण दिले आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचारी सेवा जेष्ठता यादी मधील बरेच कर्मचाऱ्यांचे शिक्षण दहावी पर्यंतच झालेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कडील वर्ग 3 व वर्ग 4 च्या काही तुटपुंज्या पदावरच ग्रामपंचायत कर्मचारी पात्र ठरत आहे.त्यातच शासनाच्या पद भरतीला वेळोवेळी बराच विलंब होत आलेला आहे.तसेच 45 वर्षे वयाच्या अटीमुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वय 45 पूर्ण झाले की तो अपात्र होऊन जेष्ठता यादीतूनआपोआप कमी केला जातो. शासनाची नोकरी मिळेल या आशेवर प्रामाणिक काम करायचं पण त्यात भरतीला विलंब आणि वयाची अट यामुळे अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास काढून घेतल्या सारखं झालं आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादा ओलांडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत मध्ये गेली 20 ते 25 वर्षे गावाच्या शिव्या खाऊन कमी पगारात नोकरी करायची त्यात वयाच्या अटी मधून बाहेर गेल्याने अशा अनेक कर्मचाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तथापि जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये सरळ सेवेने आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी या पदासाठी बऱ्याच जागा रिक्त आहेत परंतु त्यासाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमा अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव असलेबाबत सदर प्रमाणपत्राची आवश्यकता असते.परंतु सन 1995-1996 पासून सदरचा विभाग बंद होऊन प्रमाणपत्र दिले जात नाही. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या गावांमध्ये साथरोग उद्भवू नये यासाठी धूर फवारणी औषध फवारणी व सार्वजनिक गटर्स शौचालय मुतारी परिसरात फॉलिडॉल डस्ट फवारणी करणे अशी कामे कायमस्वरूपी करत आहेत. तसेच गेली दोन वर्षे कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी गावागावांमध्ये अलगीकरण केंद्रामध्ये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सोडियम हैपो क्लोराईड ची फवारणी करत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फवारणीची वेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकताच नाही असे वाटते. ग्रामपंचायत कर्मचारी हा फ्रन्टलाइन कर्मचारी कोविड योद्धा म्हणून काम करत आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी यांसाठी 90 दिवसांच्या फवारणी प्रमाणपत्राची अट शिथिल करून अशा जागेवर रिक्त पदाच्या दहा टक्के जागेवर ग्रामपंचायत सेवा जेष्ठता यादी मधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे बाबत ग्रामविकास खात्याचे मंत्री या नात्याने आपले कडून 10 % नोकर भरती तात्काळ भरती करावी तसेच आरोग्य प्रमाण पत्राची अट कायमस्वरूपी रद्द करावी असा आदेश व्हावा.अशी विंनती वजा मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे. व राजेंद्र पाटील. यड्रावकर यांच्याकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां मधून होत आहे.जर मंत्री महोदयांनी मागणी मंजूर केली तर ग्रामस्तरावरील अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागात नोकरी करण्याची संधी नक्की मिळेल यात शंकाचं नाही.
No comments