Header Ads

Header ADS

होमिओपॅथिक औषधाचे महापौर सौ.निलोफर आजरेकर यांचेकडून प्रभाग क्र.26 मध्ये वाटप


कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याबाबत आज डॉ.एस.एच.जोशी व आजरेकर फौंडेशन यांनी प्रभाग क्र.26 कॉमर्स कॉलेज या त्यांच्या प्रभागातील नागरीकांना होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप महापौर सौ.निलोफर आजरेकर यांच्या हस्ते केले.
सध्या जगामध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणुच्या कठिन काळात नागरीकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरीबद्दल दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ.एस.एच.जोशी व आजरेकर फौंडेशन यांच्यावतीने हि औषधे मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या औषधामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास तसेच कोणत्याही आजारापासून संरक्षणास या औषधाचा उपयोग होणार आहे.
यावेळी आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर, अश्कीन आजरेकर, वर्षा मोरे, विकी पंडत, अक्षय बुजुगडे, अभिजित सुर्यवंशी, साईद तांबोळी, समीर बागवान, सारुक शेख, रोहन कांबळे, निलेश भोसले, सारफराज जमादार, अर्जुन मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments