आरोग्य विभागाच्यावतीने तिसऱ्या टप्यात 6389 घरांचे व 28460 लोकांचे सर्व्हेक्षण
कोल्हापूर : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पाʉर्ाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नाग्रीकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्यात दि.21 मे 2020 रोजी 6389 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 28460 नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण बाजार गेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँन्ड, न्यु पॅलेस परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, माकडवाला वसाहत, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, न्यु शाहुपूरी, सदर बाझार, विचारे माळ, कदमवाडी, बापट कॅम्प, गजानन महाराज नगर, जवाहर नगर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, अंबाई टँक, रामानंद नगर, जरगनगर, जवाहर नगर, नेहरु नगर, म्हाडा कॉलनी, राजेंद्र नगर, ताराराणी कॉलनी या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या तिसऱ्या टप्यामध्ये आज अखेर 52365 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 226513 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.
No comments