Header Ads

Header ADS

उत्तरेश्वर थाळी उपक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट

     

       कोल्हापूर :  उत्तरेश्वर पेठेतील अनेक सामाजीक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोर-गरीब लोकांना पोटभर अन्न मिळावे या उद्देशाने सामाजिक जाणिवेतून पाच रुपयांत भरपेट जेवणासाठी उत्तरेश्वर थाळी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेली महिनाभर हा उपक्रम सुरू असून रोज जवळपास चारशे ते पाचशे गरजू लोकांना याचा लाभ या उपक्रमातून मिळत आहे. नाममात्र पाच रुपयांत २ चपाती, भाजी, आमटी, भात, लोणचे, गोड पदार्थ या थाळीमध्ये दिले जातात. बुधवार आणि रविवार या दिवशी जेवणामध्ये मांसाहाराचा आस्वाद याठिकाणी दिला जातो हि याठीकाणीची विशेष बाब होय. उत्तरेश्वर पेठेच्यावतीने स्वखर्चातून, मदतीच्या स्वरूपातून हा सेवाभावी उपक्रम सुरु आहे.
        आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या उपक्रमास सदिच्छा भेट देऊन गरजूंना जेवणाचे वितरण केले. सेवाभावी वृत्तीने चाललेल्या उपक्रमाचे कौतुक करून जास्ती-जास्त गोर-गरीब लोकांना या सेवेच्या माध्यमातून मदत पोहचावी असे आवाहन त्यांनी संयोजकांना केले. त्याचबरोबर जो पर्यंत हा उपक्रम सुरु आहे तोपर्यंत वस्तू स्वरूपात मदत करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
        यावेळी प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा सरचिटणीस अशोक देसाई, जयेश कदम, सचिन तोडकर, राजू लिंग्रज, उमेश निगडे, विजय जाधव, बाबा फरास, मधुकर बिरांजे, संयोजक उदय प्रभावळे, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments