छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यात बैतुल माल समितीचे कौतुकास्पद काम : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
सी.पी.आर. मधील 10 बेडच्या अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा पुरोगामी आणि समतेचा संदेश देणारा जिल्हा आहे. अशा या जिल्ह्यात बैतुल माल समितीने कौतुकास्पद कार्य करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाला जात, धर्म नाही. त्याच्यावर औषध निघेपर्यंत आपल्या सर्वांना दक्ष राहिले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ज्या रूग्णालयांचा समावेश आहे, त्यांनी रूग्णांवर उपचार करावेत, कोणताही गैरफायदा घेऊ नये. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे, असेही ते म्हणाले.
खासदार प्रा. मंडलिक म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये सुसज्ज करण्यासाठी प्रत्येक आमदारांनी 20 लाख रूपयांचा निधी जाहीर केला आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम कोरोनासाठी देण्यात येणार असल्याचे सांगून 1 कोटीचा निधी कोरोनासाठी दिला असल्याचे ते म्हणाले.
बैतुल माल समितीचे अध्यक्ष जाफरबाबा यांनीही मनोगत व्यक्त करून गेल्या 12 वर्षांपासून गरिबांसाठी सुरू असणाऱ्या समितीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तौफिक मुल्लाणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्र.अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आदिल फरास आदी उपस्थित होते.
वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे- जिल्हाधिकारी आज ईदच्या निमित्ताने इचलकरंजी येथील मुस्लिम समाजाने केलेल्या मदतीतून आय.जी.एम. रूग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. त्याचबरोबर बैतुल माल समितीने केलेल्या मदतीतून सी.पी.आर. येथे 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. याची प्रेरणा घेऊन विविध सामाजिक संस्थांनी वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढे यावे आणि जिल्ह्यासाठी वैद्यकीय उपकरणांची मदत द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे. |
No comments