Header Ads

Header ADS

वैद्यकीय अभ्यासक्रमपरीक्षा 15 जुलैपासून

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनिश्र्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना याबाबत माहिती दिली.

विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्समतसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 15 जुलैपासून परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. मात्र, काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्र्चित केले जाईल अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे.

No comments