Header Ads

Header ADS

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 16.82 मि.मी पाऊस

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 16.82 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पासाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 10(222), सावंतवाडी 17(214), वेंगुर्ला 18.6(183.6), कुडाळ 3(157), मालवण 28(232), कणकवली 10(120), देवगड 20(161), वैभववाडी 28(231), असा पाऊस झाला आहे.

अरुणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात 70.20 मि.मी पाऊस

अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 70.20 मि.मी. पाऊस झाला आहे. तर देवघर धरणाच्या क्षेत्रात 21 मि.मी आणि कोर्ले सातांडी प्रकल्पक्षेत्रात 20 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 215.6640 द.ल.घ.मी पाणी साठा आहे.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 25.5110, अरुणा – 19.6000, कोर्ले- सातंडी – 22.3200. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे – शिवडाव – 1.0281, नाधवडे – 1.8012, ओटाव – 1.6311, देंदोनवाडी – 0.2375, तरंदळे – 0.5760, आडेली – 0.0240, आंबोली – 0.3160, चोरगेवाडी – 0.6530, हातेरी – 0.2720, माडखोल – 1.1060, निळेली – 0.4050, ओरोस बुद्रुक – 0.4080, सनमटेंब – 0.5120, तळेवाडी – डिगस – 0.2280, दाभाचीवाडी – 0.5580, पावशी – 0.7240, शिरवल – 0.5270, पुळास – 0.1300, वाफोली – 0.0230 कारीवडे – 0.1540, धामापूर – 0.4960, हरकूळ – 0.4670, ओसरगाव – 0.0180, ओझरम – 0.4260, पोईप – 0.0, शिरगाव – 0.0350, तिथवली – 0.3980, लोरे – 0.0630 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

No comments