Header Ads

Header ADS

महास्वच्छता अभियानात 4 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा


कोल्हापूर  : कोव्हीड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत आज शहरातील नाले स्वच्छता व औषध फवारणी मोहिम आज राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये 4 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 58 वा रविवार असून या अभियानामध्ये आय.सी.आय.सी.आय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख सबिंत मलिक, अनिल हिरजे व 25 अधिकारी व कर्मचारी, विद्यापीठ हायस्कुल सन 1982-83 बॅचचे माजी विद्यार्थी, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, अपूर्वा खांडेकर, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजनेचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रभाग क्र.2 भगतसिंह वसाहत झोपडपट्टी येथे औषध फवारणी करण्यात आली. तसेच नागरीकांना आपण घरीच रहा, सुरक्षित रहा, विनाकारण बाहेर फिरु नका असे प्रबोधनही केले.
याबरोबरच संभाजी महाराज मंदिर पंचगंगा नदी परिसर येथे स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच दि.6 जून 2020 रोजी शास्त्रीनगर येथील श्री.सिद्वीविनायक हार्ट हॉस्पीटल वर जैव वैद्यकीय कचरा सार्वजनीक ठिकाणी टाकले बद्दल त्यांच्यावर रक्कम रुपये 5000/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर यांनी केली.
सदरची स्वच्छता मोहिम हॉकी स्टेडियम नजीक जयंती नाला, पंचगंगा स्मशानभूमी परिसर, प्रभाग क्र.2 भगतसिंह वसाहत झोपडपट्टी, कसबा बावडा नदी घाट परिसर, जयंती पुल ते पंचगंगा स्मशानभूमी नालासफाई, जयंती पंपीग स्टेशन, पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसर याठिकाणी राबविण्यात आली. या मोहिमेत 5 जेसीबी, 6 डंपर, 6 आरसी गाडया, 1 पाण्याचा टँकर, 2 टँकरद्वारे औषध फवारणी करण्यात आली. तसेच महापालिकेच्या 70 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने मोहिम राबविण्यात आली.
यावेळी आयुक्त आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments