पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास वारसांना 50 लाख
मुंबई : जीव धोक्यात घालून कोरोनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचे विमा कवच देण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाचे वार्तांकन करताना एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसांना ही 50 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. कोरोनासंबंधित बातम्या लोकांपर्यंत पोहोचविताना अनेक पत्रकारांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कामकरणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांच्या धर्तीवर विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी पत्रकार संघटनांमधून करण्यात येत होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर पत्रकारांच्या वारसांना ही र्नकममिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
No comments