Header Ads

Header ADS

गगनबावड्यात काल 92 मिमी पाऊस, राधानगरी धरणात 44.79 दलघमी पाणीसाठा; कोयनेतून 1050 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर  (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 92 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 3.63 मिमी एकूण 35.75 मिमी, शिरोळ- 0.57 मिमी एकूण 19 मिमी, पन्हाळा- 24 एकूण 133.29 मिमी, शाहूवाडी- 37.67 मिमी एकूण 164.33, राधानगरी- 22.67 मिमी एकूण 111 मिमी, गगनबावडा-92 मिमी एकूण 289.50 मिमी, करवीर- 8.45 मिमी एकूण 135.82 मिमी, कागल- 12.86 मिमी एकूण 101 मिमी, गडहिंग्लज-00 मिमी एकूण 67.14 मिमी, भुदरगड- 2.80 मिमी एकूण 108.60 मिमी, आजरा- 5.25 मिमी एकूण 127 मिमी, चंदगड- 4.33 मिमी एकूण 150.33 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

राधानगरी धरणात 44.79 दलघमी पाणीसाठा; कोयनेतून 1050 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 44.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 47.17 दलघमी, वारणा 330.93 दलघमी, दूधगंगा 210.76 दलघमी, कासारी 24.18 दलघमी, कडवी 31.01 दलघमी, कुंभी 27.66 दलघमी, पाटगाव 23.98 दलघमी, चिकोत्रा 13.87 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 8.05 दलघमी, घटप्रभा 13.95 दलघमी, जांबरे 6.11 दलघमी, कोदे (ल पा) 1.23 दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 12.9 फूट, सुर्वे 14.2 फूट, रुई 40.6 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 20.6 फूट, राजापूर 13.6 फूट तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 9.2 फूट अशी आहे. 

No comments