निराधार पेन्शन मजूर पत्र वाटप

कामेरी : इलाई मुल्ला यांना पत्र देताना रणजित पाटील, छायाताई पाटील, सुनिल पाटील, संग्रामपाटील व इतर मान्यवर.
कामेरी : कामेरी येथे विधवा, अंपग, निराधार व गरजू लोकांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, भैरवनाथ पतसंस्था संस्थापक सुनिल पाटील, सांगली राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला संघटना अध्यक्षा छाया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हे प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम जगदिश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच किरण खोत, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान, तलाठी, मंडल अधिकारी, सेतू, ग्रामपंचायत कार्यालय यांचेही सहकार्य लाभले.
सुनील पाटील म्हणाले की, हे काम आविरतपणे निस्वार्थीपणे करणारे कामेरी गावचे संग्राम पाटील यांच्या या समाज सेवेसाठी माझ्या शुभेच्छा व समाजातील गरीबांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपले काम जणु देवानेच आपणास या कामासाठी माझ्याकडून आशिर्वाद देत आहे. आपणास या कामी लागेल ती मदत करणार या ठिकाणी मी कबुली देत आहे. तसेच जमाजसेवेचा वसा असाच आपल्याकडुन चालु राहिल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
प्रकाश माने, राहुल वडर, आशाताई नाईक, पार्वती सुतार, बळवंत वाघमोडे, मालन गुरव, लतिका गायकवाड, प्रकाश गायकवाड, मनोज माने, दिक्षा कांबळे, बाबासो पाटील, अमोल निंबाळकर, कलावती शिंदे, रुपेश जाधव, इलाई मुल्ला, आरती जाधव यांना मासिक पेन्शन मंजूर झाली.
No comments