परिवहन कार्यालयात वाहनविषयक सर्व कामे सुरु
सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिबीरविषय कार्यक्रम वगळता उर्वरित सर्व कामकाज सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
कार्यालयामध्ये अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती दुय्यम करणे, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण करणे, परवानाविषयक सर्व कामे, वायुवेग पथक आदी सर्व कामे सुरु करण्यात आली आहेत. अनुज्ञप्ती व वाहन विषयक कामासाठी आगाऊ वेळ निर्धारण प्रणाली कार्यालयातील उपलब्ध अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्यनुसार निश्चित करण्यात आली आहे. तसेच शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी घेताना दोन अर्जदारांच्या मध्ये किमान 6 फूट अंतर असणे आवश्यक आहे. एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, कि-बोर्ड सॅनिटाईज करुन घेण्यात येईल, अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घालून कार्यालयात प्रवेश दिला लाईल.
लॉकडाऊनच्या कालावधीत शिकाऊ अनुज्ञप्ती जारी केलेल्या व ज्यांची वैद्यता संपली आहे. अशा शिकाऊ अनुज्ञप्तीची वैद्यता 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी वाहन सॅनिटाईज केल्यानंतर करण्यात येणार आहे. तरी याबाबतची नोंद सर्व वाहनधारकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जि. प. महिला व बालकल्याण समितीची सर्वसाधारण सभा 19 जून रोजी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 19 जून रोजी सकाळी 11.30 वाजता बॅ. नाथ पै समिती सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) यांनी दिली.

No comments