Header Ads

Header ADS

जिल्ह्यात 713 पॉझिटिव्ह; 616 जणांना डिस्चार्ज : डॉ. बी. सी. केम्पी पाटील

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात आजअखेर 713 रूग्णांपैकी 616 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 214 प्राप्त अवालापैकी 206 अहवाल निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझीटिव्ह आहे. यामध्ये पाठपुराव्याने 1 अहवाल पोझिटिव्ह, 3 अहवाल नाकारण्यात आले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 निगेटिव्ह अहवालाचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 89 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवालामध्ये करवीर तालुक्यातील-2 व कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील-1 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 9, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 64, शाहुवाडी- 176, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-26 असे एकूण 705 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 713 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 713 रूग्णांपैकी 616 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 89 इतकी आहे.

0 0 0 0 0 0

No comments