महास्वच्छता अभियानात 1 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा
सदरची स्वच्छता सायबर चौक ते केएसबीपी गार्डन चौक, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी संपूर्ण परिसर, सायबर चौक ते शिवाजी विदयापीठ चौक, ताराराणी चौक ते शिरोली जकात नाका, डीएसपी ऑफिस ते लाईन बझार मेनरोड येथे करण्यात आली. यावेळी स्वरा फाउंडेशनच्यावतीने पंचगंगा घाट परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
आजच्या स्वच्छता मोहिमेत 3 जेसीबी, 6 डंपर, 6 आरसी गाडया, 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 औषध फवारणीचा वापर करण्यात आला. तसेच सदरची मोहिम महापालिकेच्या 150 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने राबविण्यात आली.
यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखील पाडळकर, स्वरा फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, डॉ.अविनाश शिंदे, आयुष शिंदे, फैजान देसाई, यश रुकदिकर, मुकुंद कांबळे, शेखर वडंणगेकर, आरोग्य निरिक्षक निरिक्षक सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, महेश भोसले, श्रीराज होळकर, शिवाजी शिंदे, आदी उपस्थित होते.
No comments