जिल्ह्यात एकूण 5 हजार 939 जण कोरोना मुक्त : जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 939 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
No comments