Header Ads

Header ADS

कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची तीसरी बैठक



कोल्हापूर  : शासन निर्देशानुसार कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना महापालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे. या समितींच्या सदस्यांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आध्यक्षतेखाली तीसरी बैठक छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक पार पडली.

सदर बैठकीमध्ये कोविड लसीकरणाच्या अनुषगाने नियोजनाचे स्लाईड शोद्वारे वैद्यकिय अधिकारी डॉ. अमोल माने यांनी सादरीकरण केले. यामध्ये सरकारी, खाजगी आरोग्य कर्मचारी व फ्रंन्ट लाईन कर्मचाऱ्यांची मिळून एकूण 16508 इतक्या कर्मचा-यांची नोंदणी पोर्टलवर नोंद केली असन आजअखेर 10349 इतक्या सरकारी, खाजगी, आरोग्य व फ्रंन्टलाईन कर्मचाऱ्यांनी लसीकरण करण्यात आले. तसेच ज्या खाजगी वैद्यकिय व्यवसाईक यांच्याकडील आरोग्य कर्मचाऱ्यांचे को व्हॅक्स सॉफटवेअरला रजिस्टेशन केले नसले तरी आता ऑन द स्पॉट कोवीड रजिस्टेशन व लसीकरण करणेबाबतची व्यवस्था करण्यात आली आहे. अद्याप कोवीड रजिस्टेशन व लसीकरण न केलेल्या आरोग्य संस्थेंना त्वरीत लसीकरण करणेचे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

शासन आदेशाप्रमाणे 45 ते 60 वयोमर्यादेतील कोमॉबीर्ड व 60 वर्ष वरील जेष्ठ नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने रजिस्टेशन करुन कोवीड लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 60 वर्षावरील नागरीकांना वयाचा दाखला व 45 ते 60 वर्षापर्यंतच्या नागरीकांना कोमॉर्बीडचा व वयाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. याकरीता शहरातील खाजगी व्यवसायिक केपीसी हॉस्पीटल, ॲपल हॉस्पीटल, डायमंड हॉस्पीटल, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटल, सिध्दीविनायक हॉस्पीटल या 5 मुख्य हॉस्पीटलमध्ये प्राथमिक स्तरावर कोवीड लसीकरण करण्यात येणार आहे. या खाजगी हॉस्पीटलमध्ये 250/- रुपये नाममात्र फि आकारुन लसीकरण करण्यात येणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सदरची लस सर्वांनाच मोफत दिली जाणार आहे.

सदर बैठकीस उपआयुक्त निखिल मोरे, सहा.आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ए.एम.शिर्के, बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ.संगीता कुभोंजकर, कोल्हापूर स्त्रीरोग संघटणा अध्यक्षय डॉ. मंजूशा पिशवीकर, जनरल प्रॅक्टशनर्स असोसिएशनचे डॉ.अरुण मुधाळे, समन्वयक राष्ट्रीय छात्र सैना सब अत्ताफ, राजवाडा पोलिस निरिक्षक पी.व्ही.जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी आर.एस.व्हिवेकर, प्रशासन वैद्यिकिय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.विद्या काळे, रमेश जाधव, लसीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ.रुपाली यादव आदी उपस्थित होते.

No comments