महापालिका लोकशाही दिनात 29 अर्ज दाखल
कोल्हापूर :- महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजीत करण्यात येत आहे. महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण 29 अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व 29 अर्ज लोकशाही दिनाच्या कार्यकक्षेत घेण्यात आले. या अर्जापैकी नगररचना विभागाशी संबधीत 15, इस्टेट विभागाशी संबंधीत 3, पवडी विभागीय कार्यालय संबधीत 2, शहर पाणी पुरवठा विभाग संबधीत 2, आरोग्य विभाग संबधीत 1, विद्युत विभाग संबधीत 1, केएमटी विभागशी संबधीत 1, घरफाळा विभागाशी संबधीत 4 अर्ज आहेत. लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सूचना प्रशासक डॉ.कादबंरी बलकवडे यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. या लोकशाही दिनास महापालिकेचे संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.
No comments