महास्वच्छता अभियानात एक टन कचरा व प्लॅस्टिक गोळा
सदरची स्वच्छता शेंडापार्क ते एसएससी बोर्ड, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी मेनरोड, खानविलकर पंप ते रमनमळा चौक, दसरा चौक ते खानविलकर पंप, टेंबलाईवाडी ब्रिज, लिशा हॉटेल चौक ते कावळा नाका संपूर्ण परिसरात करण्यात आली.
स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा परिसरात स्वच्छता करण्यात आली. रंकाळा रोडवर साइडच्या बाजूने लालमाती टाकून वेगवेगळी फुलांची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आहे. तसेच रंकाळा तलाव तेथील व्यावसायिकांनी आपला कचरा डस्ट बिनमध्ये ठेऊन कचरा कुंडीत टाकावा व लालमाती व झाडे लावली आहेत तेथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका असे आवाहनही करण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशन चे डायरेक्टर प्रमोद माजगावकर, प्राजक्ता माजगावकर, अध्यक्ष सविता पाडलकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, डॉ.अविनाश शिंदे, फैजाण देसाई, साक्षी गुंडकली, संमेश कांबळे, आयुश शिंदे, सरफराज मिद्या, धर्मराज पाडलकर, शेखर वडणगेकर, काका पाडलकर व सदस्य उपस्थीत होते.
आजच्या स्वच्छता मोहिमेत 2 जेसीबी, 4 डंपर, 6 आरसी गाडया, 1 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 औषध फवारणीचा वापर करण्यात आला. तसेच सदरची मोहिम महापालिकेच्या 130 स्वच्छता कर्मचायांच्या सहाय्याने राबविण्यात आली.
यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, श्रीराज होळकर, शिवाजी शिंदे, स्वप्नील उपले आदी उपस्थित होते.
No comments