वेळ निघून जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.24 : दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. क्षयरोग ही एक प्रमुख आरोग्य समस्या असून देशात सुमारे दररोज 6000 व्यक्तींना नव्याने
क्षयरोगाची लागण होते.तर दररोज 5 मिनिटाला 2 क्षय रुग्य मृत्यू पावतात. यासाठी क्षयरोगाविषयी
जगजागृती होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे सन 2025 पर्यत्न भारत देश क्षयमुक्त करायचं
आहे.त्यासाठी समाजाती प्रत्येक घटकांनी योगदान दिले तर टीबी मुक्त देश करणे शक्य आहे. क्षयरोग हा तसा
प्राचीन आजार असून पुर्वी आयुर्वेदामध्ये हा आजार राजयक्षम या नावाने परिचित होता. 1882 पुर्वी क्षयरोग
कसा व कोणत्या जंतुमुळे होतो हे माहीत नव्हते 24 मार्च 1882 रोजी सर रॉबर्ट कोच या जर्मन शास्त्रज्ञांनी
क्षयरोगास कारणीभूत असणारा जिवाणू मायकोबाक्टेरियम टुबरकुलोसिस शोधून काढला म्हणून 24 मार्च हा
दिवस दरवर्षी सर्वत्र जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
क्षयरोगला आळा घालण्यसाठी भारतामध्ये 1962 साली राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रम सूरु करण्यात आला.
1993 साली या कार्यक्रमास बदल करुन सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरु झाला. त्यांनतर
2020 या चालू वर्षी कार्यक्रमाचे नाव बदलून राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम सुरु झाला यामध्ये
प्रामुख्याने रुग्ण शोधाचे प्रमाण प्रती एक लाख लोकसंख्येमागे 199 रुग्णांपर्यत 44रुग्णांपर्यत कमी करणे हा
हूतु आहे.
क्षयरोगाचे वर्गीकरण- क्षयरोगाचे वर्गीकरण मुख्यता दोन प्रकारत होते. 1 फुफ्फुसाचा क्षयरोग 80% रुग्णांना
फुफ्फुसाचा क्षयरोग होतो , फुफ्फुसेतर क्षयरोग 20%रुग्णांना फुफ्फुसेतर क्षयरोग होतो. यामध्ये
दात,केस,नखे सोडल्यास इतर सर्व अवयवांना क्षयरोग होतो. पोटाची टीबी,हाडांची टीबी, मज्जासंस्थेचा
टीबी, जनन व विसर्जन संस्थेचा टीबी, गंडमाळा इ. प्रकारचा क्षयरोग असू शकतो.
क्षयरोगाची लक्षणे :- दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त् कालावधीत खोकला, सायंकाळी हलकासा येणारा
ताप, भुख मंदावणे,भुख न लागणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, काहीवेळा बेढक्यातून रुक्त पडणे
,फुफ्फुसेतर क्षयरोगामध्ये त्या अवयवाशी निगडीत लक्षणे दिसतात.
क्षयरोगाचे निदान :- क्षयरोगाचे निदान बेडका व छातीचा एक्सरे तपासणीवरुन केले जाते. तसेच CBNAAT
या अत्याधुनिक मशीनव्दारे केले जाते. या तपासणीमध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये क्षयरोगाचे जतु आहेत की नाही
हे समजते आणि असतील तर ते rifampicineया महत्वाच्या प्रथम श्रेणीतील औषधला दाद देतात की नाही हे
ही समजते. औषधोपचार हे शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील रुग्णांसाठी मोफत आहे. औषधौपचार पध्दती -
क्षयरोगाच्या औषधौपचार पध्दतीकरिता क्षयरोगाचे दोन पध्दतीमध्ये वर्गीकरण केली जाते.
Drug Sensitive TB औषधराना दाद देणारा - या पध्दतीमध्ये रुगण CBNAAT अहवालावरुन प्रथम
श्रेणीतील औषधांना दाद देणारा असेल तर त्याला 6 मिहिन्याचा प्रथम श्रेणीतील औषधौपचार सुरु केला
जोतो. या मध्ये प्रथम श्रेणीतील चार औषधांचे एकत्रित मित्रण असलेले 4FDC पथम दोन महिन्यांसाठी (56
दिवस) वजनाप्रमाणे DOTS पध्दतीने दिले जाते. त्यानंतर पुढील 4 महिने (112 दिवस )3 औषधांचे
एकत्रित मिश्रण असलेले (3FDC) दिले जाते. यामध्ये रुग्णाचा 56 व पुढील 112 व्या दिवशी पाठपुरावा
केला जातो. तसेच उपचार पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक 6 महिन्यांनी दोन वर्षापर्यंत पाठपुरावा केला जातो.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये रुग्णास सुलभ व त्याच्या वेळेत औषध मिळावीत म्हणून नजीकच्या प्राथमिक
आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र , आशा स्वयंसेविका या ठिकाणी हा औषधौपचार उपलब्ध्ा केले
जातात तसेच खाजगी डॉक्टर यांच्याकडेही उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये रुग्ण् बरे होण्याचे प्रमाण 90-95 %
इतके आहे.
क्षयरोगाची गंभीरता-अनियमित किंवा अपुरा उपचार यामुळे ड्रग रेजिस्टंस (औषधाना दाद न देणारा
)क्षयरोग होऊ शकतो.
Drug Registance TB औषधांना दाद न देणारा: या पध्दतीमध्ये रुग्णास 9ते 18 महिन्याचा
औषधोपचार सुरू केला जातो. यासाठी रुग्णास डीआरटीबी सेंटर मिरज येथे ॲडमिट करुन उपचार
समितीव्दारे ठरविला जातो. या कालावधीमध्ये त्यांच्या वेगवेगळया तपासण्या केल्या जातात तसेच सुरु
केलेल्या उपचारामुळे कोणता दुष्परिणाम होतो का हे पाहिले जाते. त्यानंतर रुग्णास त्यांच्या घराजवळ
उपचार उपलब्ध करुन दिला जातो.
सन 2012 मध्ये भारत सरकारने टीबी आदिसुचीत (शासकीय यंत्रणेला कळविणे) बंधनकारक घोषित
केले असून 19 मार्च 2018 साली राजपत्र प्रकाशित करुन खाजगी क्षेत्रात औषध घेणाऱ्या सर्व रुग्णांना
शासकीय रुग्णाप्रमाणेच सार्वजनिक आरोग्याच्या सेवा व सुविधा (पब्लिक हेल्थ ॲक्शन )देणे बंधनकारक केले
आहे. तसेच मलम 269 व 270 नुसार यामध्ये दोषी आढळला तर शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ
शकते.
निक्षय पोषण योजना - शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी उपचार कालावधीकरिता
दरमहा 500 रु पोषण आहारासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये PFMS प्रणालीव्दारे जमा होतोत.
सिंधुदुर्ग जिल्हा दृष्टिक्षेप :- सिंधुदुर्ग जिल्हायामध्ये 2020 मध्ये DrugSensitive TB (औषधाना दाद
देणारा ) शासकीय आरेाग्य संस्थेमध्ये 482 क्षयरुग्ण आणि खाजगी आरोग्य संस्थेमध्ये 249 क्षयरुग्ण नोंदणी
झाली आहेत तर DrugRegistance TB (औषधाना दाद न देणारा) 50 इतके क्षयरुग्ण नोंदणी झाली आहेत.
जनतेस आवाहन :-
क्षयरोग प्रतिबंधन उपाययोजना
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी उघडयावर कुठेही थुंकु नये. सार्वजनिक व
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. दोन आठवड्यापासून खोकला येत असेल तर दुर्लक्ष करु नका.
डॉ. हर्षल जाधव
जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र सिंधुदुर्ग
No comments