विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने व दुकाने सुरु ठेवण्याऱ्यांकडून 82 नागरीकांच्याकडून 46 हजार रुपये दंड वसूल
कोल्हापूर, दि. 20 :- शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने व दुकाने सुरु ठेवण्याऱ्यां 82 नागरीक व व्यापाऱ्यांकडून 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 82 लोकांकडून 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल सोमवार, दि.19 एप्रिल 2021 रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क 80 लोकांनकडून 40000, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने 2 नागरीकांकडून 6000 असे एकुन 46 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
No comments