Header Ads

Header ADS

महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार ! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती !




सध्या राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज राज्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र अद्याप राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला, त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आज राज्य सरकारच्या मंत्रीमडळाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपेंनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. ब्रेक द चैन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावं लागेल, अशी परिस्थिती आहे. सर्व मंत्री लॉकडाऊन वाढण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचं की काय करायचं, याचा निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. लॉकडाऊन हे वाढणारच आहे. हे लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढेल असा माझा अंदाज आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

तसेच राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

No comments