सिंधुदुर्ग 1 लाख 49 हजार 138 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि.28- वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 49 हजार 138 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 9 हजार 625 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 686 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 219 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 315 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 65 हजार 447 व्यक्तींनी पहिला डोस तर 21 हजार 812 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 53 हजार 395 नागरिकांनी पहिला डोस तर 6 हजार 202 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 49 हजार 138 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 94 हजार 690 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 53 हजार 80 लसी या कोविशिल्डच्या तर 41 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 48 हजार 166 कोविशिल्ड आणि 39 हजार 987 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 88 हजार 153 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 80 लसी उपलब्ध असून त्यापैकी 840 कोविशिल्डच्या आणि 240 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 13 हजार 440 लसी शिल्लक असून त्यापैकी 12 हजार 310 कोविशिल्ड आणि 1 हजार 130 कोवॅक्सीनच्या शिल्लक आहेत.
No comments