Header Ads

Header ADS

व्याधीग्रस्त 694 नागरीकांपैकी 27 पॉझिटिव्ह



कोल्हापूर ता.28 : संजीवनी अभियानाअंतर्गत शक्रवारी 5994 नागरीकांची 11 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करण्यात आली. या सर्व्हेमध्ये आज व्याधीग्रस्त 694 नागरीकांपैकी 27 पॉझिटिव्ह व 667 निगेटिव्ह आढळून आलेत. यावेळी 5696 व्याधीग्रस्त नागरीकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोवीड सदृश्य लक्षणे असणारे 63 नागरीक आढळून आले. तर 736 व्याधीग्रस्त नागरीकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.

महापालिकेच्या शक्रवारी 11 प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या संवेदनशील भागामध्ये 150 वैद्यकिय पथकाद्वारे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये दिलबहार तालीम, लाड चौक, शहाजी वसाहत, शाहूपूरी, राजारामपूरी, दौलतनगर, दुधाळी, कागदी गल्ली, जुना बुधवार, हळदकर हॉल, कसबा बावडा, लाईन बझार, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रुईकर कॉलनी, जरगनगर, अंबाई टँक, मीरा भक्ती, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, कारंडे मळा, मार्केट यार्ड, नागाळा पार्क, रमणमळा, गंजी गल्ली, लक्ष्मीपूरी, शनिवार पेठ, प्रथमेशनगर, सुर्वेनगर येथे हे अभियान राबविण्यात आले.

No comments