ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते, भरमसाठ बिले करून लूट केली जाते, त्या हॉस्पिटलांच्याबाबत प्रशासन काय पाऊले उचलणार? राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील
इस्लामपूर दि.१७ प्रतिनिधी
ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते, भरमसाठ बिले करून लूट केली जाते, त्या हॉस्पिटलांच्याबाबत प्रशासन काय पाऊले उचलणार? असा सवाल राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील आढावा बैठकीमध्ये केला.
येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात ना.पाटील यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक
घेतली. यावेळी आ.मानसिंगभाऊ नाईक,काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब
पाटील,अँड.चिमनभाऊ डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उपसभापती नेताजीबाबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख,तहसिलदार रवींद्र सबनीस,उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी अरविंद माळी,उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
ना.पाटील म्हणाले,लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने वस्तूस्थितीची तपासणी करून कडक पाऊले उचलायला हवीत. कोरोनाग्रस्त लहान मुलांच्यासाठी छोटेसे कोविड सेंटर सुरू करावे लागेल. प्रशासनाने यासाठी तालुक्यातील लहान मुलांच्या डॉक्टरांची बैठक घेवून चर्चा करावी.
आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयास इस्लामपूरप्रमाणे अद्यावत रुग्ण वाहिका देण्यात येईल. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याशी बोलणे झाले आहे. ते लॉकडाऊनबद्दल आज माहिती देतील.
प्रारंभी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे तालुक्याचा आढावा मांडताना म्हणाले,सध्या तालुक्यामध्ये २३७९ कोरोना रुग्ण आहेत. तालुक्या त कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ३.६५ टक्के इतका आहे,तर बरे होण्याचा दर ७५.६९ टक्के इतका आहे. आम्ही ४५ वर्षावरील व्यक्तींना प्राधान्याने लस देत आहोत.
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले,कोरोना रुग्णांची नोंद आपल्याकडे येते. मात्र त्यांच्या सहवासातील संशयित रुग्णांची नोंद आपल्याकडे आहे का? याबाबत नोंदी घेवून योग्यती खबरदारी घ्यायला हवी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या किती आहे? अशी विचारणा करून त्यावर आपण काय कारवाई केली? असा प्रश्न केला.
आष्टयाचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्ण वाहिका, व शव वाहिकेची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे यांनी एक-दोन उदाहरणे सांगून शहरातील काही हॉस्पिटलमध्ये विधारक परिस्थिती असून त्याची चौकशी व्हावी,अशी मागणी केली.
तालुका आरोग्याधिकारी डॉ.साकेत पाटील,आष्टयाचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण,
डॉ.अशोक शेंडे,पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,सुभाषराव सूर्यवंशी,विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील,संग्राम पाटील, खंडेराव जाधव,विराज शिंदे, संग्राम फडतरे,विश्वनाथ डांगे,पं.स. सदस्य आनंदराव पाटील,संदीप पाटील, पिरअली पुणेकर,आयुब हवालदार, तसेच पदाधिकारी,व तालुक्यातील अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
फोटो ओळी- इस्लामपूर येथील आढावा बैठकीमध्ये बोलताना ना.जयंतराव पाटील. समवेत आ.मानसिंगभाऊ नाईक,बाळासाहेब पाटील,अँड.चिमनभाऊ डांगे, दादासाहेब पाटील,शहाजीबापू पाटील,नेताजीबाबा पाटील,तसेच अधिकारी,व पदाधिकारी.
No comments