*एक घास आपुलकीचा वरणगेच्या शिवसैनिकाचा*-------
--
प्रथमेश वाडकर. \बालिंगा : करवीर तालुक्यातील वरणगे येथील आदर्श शिवसैनिक बाप से बेटा सवाई या उक्तीप्रमाणे शिवसेना करवीर तालुका मा.शिवसेनाप्रमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच वरणगे गावचे माजी सरपंच तानाजी आंग्रे यांनी आपली पूर्ण हयात शिवसेनेशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि करीत आहेत. सेवेत राजकारण कमी व समाजकारण जास्त करत समाजाची सेवा करीत आहेत. त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांचा मुलगा ऋषिकेश तानाजी आंग्रे ( जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ) याने ही आपल्या वडिलांप्रमाणे समाजसेवेचा ध्यास घेऊन आपला वाढदिवस साजरा केला नाही तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तानाजी आंग्रे युवा मंच वरणगेच्या माध्यमातून सध्याच्या कोरोना स्थितीमध्ये एक छोटीशी मदत म्हणून एक घास आपुलकीचा"" या भावनेतून जिल्ह्यातील पोलीस तसेच वैद्यकीय कर्मचारी व गरजू अशा 300 लोकांना स्वतः जेवण करून मित्र मधुकर आंग्रे, सौरभ आंग्रे, शरद बंगडे, पंकज पाटील, संग्राम गायकवाड, स्वप्नील पाटील, तुषार आंग्रे ,प्रदीप पाटील, अनिकेत पाटील ,सचिन आंग्रे, शुभम यादव यांच्या समवेत .शिवाजी पूल, दसरा chok, पोस्ट ऑफीस बावडा, शिये नाका, कावळा नाका ,C B,S स्टँड, सावित्रीबाई फूले दवाखाना येथे रुग्ण व नातेवाईक यांना वाटप करून उपक्रमाची सांगता केली यामुळे मानसिक समाधान लाभल्याचे ऋषिकेष यांनी यावेळी सांगितले. खरोखरच अतिशय लहान वयामध्ये घेतलेला हा समाजसेवेचा वसा व समाजसेवेची असणारी तळमळ यातून दिसून आली. ज्या वयात मित्रमंडळी सोबत घेऊन एक नव्हे तर दहा दहा केक कापून वाढदिवस साजरा करून रात्री पार्टीचे नियोजन करताना पहायला मिळायचे . पण या कोरोणा आजाराने संपूर्ण महाराष्ट्रावर आक्रमक केले आहे. या कोरोणाला हरविन्यासाठी शासन सातत्याने सर्वच स्तरावर कोरोणा समूळ नष्ट करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतांना दिसत आहे. आपणही याला थोडासा हातभार लावावा या भावनेतून वडील तानाजी आंग्रे यांच्याशी व घरातील कुटुंबाशी चर्चा करून ऋषिकेष याने आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला या विनाकारण होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन कोरोणा काळात फक्त जनतेसाठी आपल्या जीवाची बाजी लाऊन कार्यरत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हातील पोलीस कर्मचारी व वैधकिय कर्मचारी तसेच गरीब गरजूंकरिता अशा 300 लोकांना स्वतः जेवण करून दिले. खरोखरच ज्या वयात मौजमस्ती त्या लहान वयात घेतलेला हा समाज सेवेचा वसा आणि समाजसेवीची असणारी तळमळ तरुण वर्गाच्या डोळ्यात आंजन घालणारी आहे. या तरुण मुलाने केलेल्या समाजसेवेने माणसाने माणसासाठी केलेले काम यातून कोल्हापुरातील माणुसकी पुन्हा एकदा या निमिताने उदयास आली आहे.
No comments