29 वर्षे केलेल्या सेवेचं सार्थक झालं .... मधुरा मोरे सावर्डे दुमाला ग्रामपंचायती कडून आपुलकीचा सत्कार
बालिंगा: प्रतिनिधी: प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमालाच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी डॉक्टर मधुरा विलास मोरे. यांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामाच्या योगदानाबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडून त्यांना *धन्वंतरी पुरस्कार* जाहीर करण्यात आला.डॉ.मधुरा मोरे.या गेली 29 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहेत. या सेवा काळात करवीर तालुक्यातील कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आठ (8)वर्षे, भुयेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आठरा (18)वर्षे, सेवा बजावली आहे. तसेच आता शिरोली दुमाला आरोग्य केंद्रात तीन वर्षे सेवा करीत आहे. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता प्रामाणिक काम केल्यास फळं नेहमी चांगल मिळत हे या पुरस्काराच्या निमित्ताने अनुभवास आले.असे मोरे यांनी सांगून 29 वर्षाची सेवा फळास गेली असे म्हणाल्या. यासाठी सर्व कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत . डॉ. मोरे. यांनी अनेक अडचणीना तोंड देऊन आरोग्य सेवा गरीब, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच महापुराच्या काळात गावात साथीचा आजार पसरू नये यासाठी प्रयत्न केले होते.याची दखल जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यातआली. व सन2019/20 चा दिला जाणारा *धन्वंतरी पुरस्कार* जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मोरे. व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमालातील सर्वच स्टाफने कोरोना सारख्या अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये चांगले काम करून भागातील सर्व लोकांना उत्तम सेवा देण्याचे काम केलेले आहे .या कोरोना योद्ध्यांचा सन्मान व सत्कार करणे शिरोली आरोग्य केंद्रातर्गत गावांच आद्य कर्तव्य आहे.यातून सावर्डे दुमालाच्या सरपंच सुवर्णा कारंडे. यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अभिनंदन करून सरपंच व सर्व पदाधिकारी सावर्डे दुमाला यांनी शिरोली दुमाला आरोग्य केंद्र येथे जाऊन डॉ. मोरे. व त्यांचा सर्व स्टाप यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी माजी सरपंच कुंडलिक कारंडे, माजी उपसरपंच व सदस्य संतोषकुमार पाटील, दत्तात्रय निकम, अमर कारंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, गणेश कारंडे, धनाजी निकम आदी उपस्थीत होते.
No comments