Header Ads

Header ADS

खुपिरेत सापडले १००० रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

 

बालिंगा । प्रतिनिधी :- खुपिरे (ता. करवीर) येथे "माझं गाव ,माझी जबाबदारी" या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावातील १००० रुग्णांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 
               खुपीरे सरपंच  दिपाली  जांभळे.  यानी बोलताना ग्रामस्थांना पूर्ण खबरदारी घ्यावी असे आवाहन करून. गावातील २००० लोकांची तपासणी करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
                यासाठी उपसरपंच युवराज पाटील, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक कृष्णात गुरव, तलाठी सौ.बेळणेकर,पोलीस पाटील सविता गुरव, तंटामुक्त अध्यक्ष दिलीप पाटील, ग्रामीण रुग्णालय अधिकारी डॉ. थोरात,आरोग्य सेवक मिथबावकर, आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

       चौकट
       *सरपंचांनी केली स्वतःपासून सुरुवात*-
सरपंच दीपाली जांभळे यांनी पहिल्यांदा स्वतःची अँटिजेन टेस्ट करून या संकल्पनेला सुरुवात केली.

 खुपिरे:येथील ग्रामपंचायतीच्या वतीने रॅपिड अँटिजेन टेस्टची सुरुवात करताना सरपंच दिपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील,ग्रामसेवक कृष्णात गुरव, डॉ.सौ. थोरात, मिठबावकर व इतर.

No comments