शिंगणापूर व बालिंगा जवळ नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने दोन दिवस अपूर व कमी दाबाने पाणी पुरवठा
कोल्हापूर ता.02: कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा करणा-या शिंगणापूर व बालिंगा जवळ नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पंपिग स्टेशन येथे पाणी उपसा पुरेशा प्रमाणात होत नाही. पाटबंधारे विभागाकडून धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. हे सोडलेले पाणी पंचगंगा नदी पात्रामध्ये शिंगणापूर बंधारा येथे येण्यासाठी गुरूवार दिनांक 03 जून 2021 दुपार पर्यंतचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारी व गुरूवारी संपूर्ण कोल्हापूर शहर व त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागातील नळ कनेक्शनधारकांना होणारा पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होईल. तर काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments