Header Ads

Header ADS

कोगे- बहिरेश्वर खडक धरण वाहतुकीसाठी धोकादायक पाटबंधारे विभागाकडून वाहतूक करू नये यासाठी आवाहन


प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी.  कोगे. ता. करवीर  गावच्या पश्चिमेसअसलेले कोगे - बहिरेश्वर दरम्यान असणारे धरण वाहतुकीसाठी धोकादायक आहे.  याबाबतचे वृत्त दैनिकांतून  प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर बातमीची  तात्काळ दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, करवीर पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्य राजेंद्  सूर्यवंशी,सूर्यकांत दिंडे यांनी फोनद्वारे करवीरचे आमदार पी एन पाटील. यांच्याशी संपर्क केला होता. आमदार पी एन पाटील.यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाची संपर्क करून 12 लाखाचा निधी तात्काळ मंजूर करून काम लवकर सुरु करण्याची सूचना  दिली.तसेच संपूर्ण धरण दुरुस्तीसाठी 45 लाखाचा वाढीव निधीची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. पण अचानक पावसाळा सुरू झाल्याने नदीपात्रात पाणी जास्त वाढले आहे. असाच सततधार पाऊस सुरु झाला तर धरण पाण्याखाली जाण्याची भीती नाकारता येत नाही.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाकडून  अधिकारी रोहित बांदिवडेकर यांनी या पुलावरून वाहतूक करू नये, असे पत्र कोगे व बहिरेश्वर ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात दिले आहे. याची तात्काळ कारवाई म्हणून कोगे व बहिरेश्वर ग्रामपंचायतीने बैठक बोलावून या पुलावरून वाहतूक करू नये, अशा आशयाची लेखी नोटीस दिली आहे. त्याच बरोबर पुलाच्या दोन्ही बाजूस हे पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे असा फलक लावण्यात येईल असे सांगितले आहे .दोन्ही गावातील ग्रामपंचायतीने तात्काळ दखल घेतल्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचे कौतुक केले जात आहे.

No comments