बहिरेश्वर बंधा-याला पांटबंधारे अधिकाऱ्यांची भेट तात्काळ दुरुस्तीसाठी ठेकेदारांना सूचना
*बातमीची तात्काळ दखल,,,!* पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बांदिवडेकर यांची बंधा-याला भेट दिली.आमदार पी.एन. पाटील साहेब यांचे पाटबंधारा विभागाला निधी उपलब्धतेसाठी पत्र दिलं असून तात्काळ १२ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे! तसेच बंधा-याच्या पुनर्बांधणीसाठी ४७ लाखाचा प्रस्ताव ही अंतिम टप्प्यात आहे.या बद्दल पाटबंधारे विभाग आणि आमदार पी.एन.पाटील साहेब यांचे बहिरेश्वर.ता.करवीर च्या वतीने जाहीर आभार मानतो. आता ठेकेदाराकडून बांधकाम चांगले आणि मजबूत करुन घेणे ही ग्रामस्थांची जबाबदारी,,,,! -बी.अनिल पाटील.बहिरेश्वर ता.करवीर.9850955758
* प्रथमेश वाडकर/ बालिंगा :प्रतिनिधी
कोगे बहिरेश्वर दरम्यान बंधारा हा पाणी अडवणूकीसाठी बांधणेत आला होता. त्याचा वापर हा निव्वळ पाणी आडवण्यासाठी आहे परंतु अवजड वाहतूक होत असलेने बंधारा आज शेवटची घटका मोजत आहे याबाबत करवीरच्या पश्चिम भागातील कोगे- बहिरेश्वर खडक बंधारा 60 व्या वर्षी मोजतोय अखेरची घटका अशी बातमी प्रसिध्द केली होती. याची दखल घेऊन आज.पाटबंधारे कार्यकारी अभियंता रोहीत बांधिवडेकर, उपअभियंता माने, शाखा अभियंता आंबोळे, जि प सदस्य सूभाष सातपूते आदींनी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार पी एन पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करावा अशा आशयाच पत्र पाटबंधारे विभागाला पाठवले त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने तात्काळ दुरुस्तीसाठी १२ लाख रुपये निधी उपलब्ध करून देत ताबडतोब काम करावे अशा सूचना ठेकेदारांना दिल्या. ६ जून पर्यत काम पूर्ण करू अशी ग्वाही ठेकेदार सूर्यकांत दिंडे यांनी दिली. शिवाय संपूर्णं बंधारा दूरूस्तीसाठी ४७ लाख रुपये निधीचा प्रस्ताव (मंजूरी )अंतिम टप्यात असलेच कार्यकारी अभियंता रोहीत बांधिवडेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रा प सदस्य तानाजी गोदडे,ग्रा प सदस्य उत्तम चव्हाण, माजी उपसरपंच अजित पाटील, धनाजी बचाटे, विनायक साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments