Header Ads

Header ADS

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप उपलब्ध**सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली माहिती

*

मुंबई-
कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमधे व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, त्यामुळे  व्हेंटिलेटर ला पर्याय ठरत असलेल्या ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप  मागणी होत होती, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय रुग्णालयांमध्ये सी एस आर फंडामधून ऑक्सीजन कोंन्सेटेटर व बायपॅप  उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,
कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी या वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर ठरत असल्याने व्हेंटिलेटर उपलब्ध होणार नसलेल्या रुग्णांलयामध्ये या उपकरणांचा मोठा लाभ होईल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी   ४० ऑक्सिजन कोंन्सेटेटर तर २५ बायपॅप  उपलब्ध करून दिली असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या पहाता जिल्ह्यातील आरोग्य विभाग सक्षमपणे काम करीत आहे, आरोग्य विभागाबरोबरच शासनाच्या विविध विभागातील फ्रन्टलाइन वर काम करणारे अधिकारी व कर्मचारी कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, असे असताना जनतेनेही काळजी घेताना शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत तरच या महामारीला आपण रोखू शकू असेही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हंटले आहे,
कोल्हापूर जिल्ह्यातील पारगांव, राधानगरी व गडहिंग्लज या ठिकाणी प्रत्येकी चार ऑक्सिजन कोंन्सेटेटर, आय जी एम इचलकरंजी येथे तीन, कोव्हिड हॉस्पिटल शिरोळ येथे २५ कोंन्सेटेटर उपलब्ध करून दिली आहेत,
तसेच शासकीय रुग्णालय गडिंग्लज येथे 10, कोव्हिड हॉस्पिटल शिरोळ येथे 6 तर आयजीएम इचलकरंजी येथे 9 अशी एकूण 25 बायपॅप दिली असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी  सांगितले आहे.

No comments