आपत्ती काळात उत्तम सेवा देणार _ युवराज पोवार
बालिंगा : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन आधार फोउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार. यांच्या सहकार्याने भविष्यातील उदभवणारी आपत्ती तसेच पूरपरिस्थितीचा विचार करता जीवन आधार फोउंडेशन रेस्क्यू फोर्स वतीने 90 जवानांची टीम तयार करण्यात आली आहे. आज गडमुडशिंगी ता. करवीर.येथे जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यु फोर्स महाराष्ट्र राज्य टिमच्या ट्रेनिंग चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार यांच्या हस्ते व पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या उपस्थित करण्यात आले. यांनतर रेस्क्यू फोर्स जवानांच्या ट्रेनींगला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा सौ शोभा महाजन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रविकिरण गवळी, कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष राहुल पोवार, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष विजय कांबळे,बी.आर.महाजन सर, विशाल पाटील, विनायक लांडगे, मानसी कांबळे इत्यादी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते*
No comments