दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेने घेतलेली विशेष लसीकरण मोहिम हा स्तूत्य उपक्रम– पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी.डी.पाटील
कोल्हापूर ता.11: दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेने घेतलेली विशेष लसीकरण मोहिम हा स्तूत्य उपक्रम आहे. दिव्यांगांचे कोविड पासून संरक्षण होणेसाठी याचा उपयोग होणार असलेचे प्रतिपादन पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी केले. दिव्यांगासाठी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. शाहूपूरी येथील नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईड शाखा येथे जिल्हाचे पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांचे हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसुळ, उपायुक्त निखिल मोरे तसेच नॅबचे अध्यक्ष मुरलीधर डोंगरे आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांसाठी घेतलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत 740 दिव्यांगांचे लसीकरण
शुक्रवारच्या महापालिकेच्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात 650 आणि नॅबमध्ये 90 असे मिळून 740 दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले. शहरातील विविध दिव्यांग संघटनानी तसेच दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या पालकांनी महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सध्या कोरोना आजारावर नियंत्रण मिळविणेसाठी महानगरपालिकेमार्फत कोवीड-19 लसीकरण मोहिम राबविणेत येत आहे. शहरातील 18 वर्षावरील जे दिव्यांग लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकतात अशा सर्व दिव्यांग बांधवांना कोवीड-19 लसीकरण सुलभरीत्या होणेसाठी महानगरपालिकेमार्फत पहिल्या टप्यात शुक्रवार दि.11.06.2021 रोजी विशेष लसीकरण मोहिम घेण्यात आले. हि लसीकरण मोहिम महापालिकेच्या 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर राबविण्यात आली. यामध्ये सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्र येथे 82, फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 57, राजारामपुरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 64, पंचगंगा हॉस्पीटल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 67, कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 75, महाडिक माळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 48, आयसोलेशन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 88, फुलेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 52, सदर बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 39, सिध्दार्थनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 29, मोरेमानेनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 49 असे 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात 650 आणि नॅबमध्ये 90 असे एकूण 740 दिव्यांगांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
जे दिव्यांग बांधव शुक्रवारी झालेल्या लसीकरण मोहिमेत लसीकरण केंद्रावर येऊ शकले नाही अशा दिव्यांगांनी 7020369360 या नंबरवर कॉल अथवा मॅसेजद्वारे नोंदणी करावी असे आवाहन प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले आहे. नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांचे लसीकरण पुढील आठवडयात त्यांच्या घराजवळ जावून महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.
No comments