Header Ads

Header ADS

मुख्यमंत्री सहायता निधी 'कोविड-19'साठीपुणे जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने13 लाख 32 हजार रुपयांचाधनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द


 

            मुंबईदि. 14 : मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाशी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने 13 लाख 32 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

            येथील सह्याद्री अतिथीगृहात संघटनेच्यावतीने हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र  गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदेपश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा काळभोरपुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळेराज्य संघटक नवनाथ धुमाळचिंतामण मोरेहनुमंत हंडाळअरुण पाटील-बोडकेसंपतराव जाधवसोमनाथ मुळाणेनीलकंठ थोरातदिनेश पाटीलतृप्ती मांडेकररोहिणी हांडेमोनिका कचरेप्रविणा शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व पोलीस पाटलांनी कोविड काळात गावपातळीवर दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.  या संकटकाळात कर्तव्य बजावण्याबरोबरच गावकामगार पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देण्याची संवेदनशीलता दाखविली आहेती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. 

No comments