Header Ads

Header ADS

कोल्हापूर शहरात 2134 नागरीकांचे लसीकरण


कोल्हापूर ता.07 : शहरामध्ये बुधवारी 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये 45 वर्षावरील 2127 नागरीकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस व 7 नागरीकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून 2134 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे 170, फिरंगाई येथे 281, राजारामपूरी येथे 203, पंचगंगा येथे 222, कसबा बावडा येथे 183, महाडीक माळ येथे 169, आयसोलेशन येथे 186, फुलेवाडी येथे 168, सदरबाजार येथे 205, सिध्दार्थनगर येथे 135, मोरे मानेनगर येथे 212 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 128645 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 51915 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोविशिल्डच्या दुस-या डोस घेण्यासाठी 45 वर्षावरील ज्यांचे 84 दिवस पुर्ण झालेले आहेत अशा नागरीकांनी गुरुवार, दि.8 जुलै 2021 रोजी महापालिकेच्या 11 प्राथमिक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे.

No comments