सकारात्मक वृत्तकोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 38 हजार 500 डोस उपलब्ध
कोल्हापूर, दि. 22 : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे 38 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यापैकी 1 हजार 400 लस या दिव्यांग, गर्भवती महिला व परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा -1 हजार 400, भुदरगड -1 हजार 500, चंदगड - 2 हजार 150, गडहिंग्लज-2 हजार 700, गगनबावडा -400, हातकणंगले - 7 हजार 980, कागल - 2 हजार 210, करवीर- 4 हजार 430, पन्हाळा - 2 हजार 230, राधानगरी - 2 हजार 230, शाहूवाडी - 1 हजार 880 तर शिरोळ तालुक्यासाठी 4 हजार 20 डोस प्राप्त झाले आहेत.
सीपीआर रूग्णालयासाठी 220, सेवा रूग्णालय, कसबा बावडासाठी 400 तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 4 हजार 600 असे एकूण 38 हजार 350 डोस प्राप्त झाले आहेत. 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे.
000000
No comments