Header Ads

Header ADS

वारणा धरणातून 6 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग- कार्यकारी अभियंता ज्योति देवकर


             सांगली, दि. 22, : कृष्णा, कोयना व वारणा मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने दिनांक 22 जुलै 2021 रोजी सायकाळी 5 वाजे पर्यंत कृष्णा नदीवरील आयर्विन पुल येथील पाण्याची पातळी 24 फुट इतकी आहे. आज दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रमुख धरणातील विसर्ग पुढील प्रमाणे आहे.  वारणा धरणातून 6 हजार 8 क्युसेस, कोयना धरणातून 2 हजार 100 क्युसेस, कण्हेर धरणातून 1 हजार 563 क्युसेस, उमरोडी धरणातून 2 हजार 119 क्युसेस इतका आहे. अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता  ज्योति देवकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments