Header Ads

Header ADS

*रक्तदान संकलन काळाची गरज. माजी सरपंच उत्तम पाटील.....*

बालिंगा :प्रतिनिधी :- कोरोना आजाराने सम्पूर्ण महाराट्र भयभीत झाला आहे. त्यात कोरोना रुग्णाना रक्ताची उणीव भासू लागली आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रक्तदान शिबीरे आयोजित करून रक्त संकलन करण्यासाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भुयेवाडी. ता. करवीर. येथील उत्तम पाटील युवा मंचच्या वतीने शिवसैनिक व माजी सरपंच उत्तम पाटील. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन सरपंच शैलेश देवकुळे व देवराज नरके. यांच्या हस्ते करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी  तब्बल 50 रक्तदात्यांनी  रक्तदानाचा हक्क बजावला. उत्तम पाटील. युवा मंच. यांनी घेतलेला रक्तदान शिबीर समाजउपयोगी कार्यक्रम यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होतं आहे.
 रक्तदान शिबिरावेळी युवकांचे आशास्थान देवराज नरके,सरपंच शैलेश देवकुळे, भानुदास पाटील, सरदार खाडे, अरविंद पाटील, बी. डी. पाटील, दत्तात्रय पाटील, सोमा वाघमोडे, धनाजी नरंदे, अभी शिंदे, प्रशांत विचारे, संजय पाटील,संदीप चौगले, वैभव खाडे, विश्वास पाटील(पापा ),आत्माराम पोवार. आदिसह युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments