Header Ads

Header ADS

आमशी गावासाठी उज्वल काम करणाऱ्या सरपंच उज्वला पाटील

सरपंच सौ. उज्वला रामनाथ पाटील

बालिंगा /वार्ताहर:- करवीर तालुक्यातील आमशी  मध्ये पंचवीस वर्षांनी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले, सत्ता आली, सरपंच निवड झाली, पण याच काळात सर्वत्र कोरोनाने थैमान सुरु केले. पण सरपंच पदाचा कोणताही मोठा बडेजाव न करता आमशी (तालुका करवीर) येथील सरपंच सौ. उज्वला रामनाथ पाटील या मात्र ग्रामपंचायतीच्या सर्व कामात प्रथम नागरिक या नात्याने अहोरात्र झटत आहेत. आपल्या नावाप्रमाणे गावातही उज्ज्वल काम करण्यासाठी त्यांचे युद्ध पातळीवर जोराचे प्रयत्न सुरू आहेत.
           आपण सर्वच क्षेत्रात पाहतो की,महिला मोठ्या पदावर पोहचल्या नंतर बऱ्यापैकी त्यांचे पतीचं कामाची सर्व सूत्रे आपल्याकडे ठेवतात व पत्नीकडे फक्त सहिचा अधिकार ठेवतात. आमशीच्या सरपंच उज्वला पाटील. याला अपवाद आहेत. पाटील. यांनी मात्र सरपंच झाल्या पासून सर्वच कामात आपण उपस्थित राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे धोरण ठरवले आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात गावामध्ये औषध फवारणी, कोरोनाची जनजागृती, औषधे वाटप, लसीची व्यवस्था व पॉझिटिव रुग्णांना ग्रामपंचायत मार्फत औषधांचे किट देण्यापासून  ते दवाखान्यापर्यंत पोहचवणे आदी कामात त्या स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत. घरी आयसोलेट असणाऱ्या रुग्णांना त्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहे.
           सरपंच उज्वला पाटील यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. घरातील कामाबरोबर, जनावरांच्या धारा, शेण काढण्याबरोबर शेतीची कामातुनही त्या आपल्या सरपंच पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागामार्फत गावांमध्ये सुरू असणाऱ्या आरटीपीसी टेस्ट साठी लोकांच्यात जनजागृती करण्यासाठी त्या नेहमी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबत काम करताना दिसत आहेत.
                          चौकट
आमशी गाव हे माझे कुटुंब समजून मी काम करत आहे.करवीरचे प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गावातील सर्व नेते मंडळी, उपसरपंच सर्व सदस्य, सदस्या,तलाठी,कोरोना दक्षता समिती, आरोग्य विभागाचे कर्मचारी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त करणार आहे. माझ्या या कामात माझे पती रामनाथ पाटील व ग्रामसेवक शिवाजी वाडकर यांची मोलाची साथ लाभत आहे.
(सौ.उज्वला रामनाथ पाटील-सरपंच ग्रामपंचायत आमशी).

No comments