Header Ads

Header ADS

बालिंगा ग्रामस्थांच्या मागणीला यश ..*सरपंच मयूर जांभळे यांचेकडून प्रशासनाचे आभार

       बालिंगा :  प्रतिनिधी :- सध्या शासनाच्या वतीने गावोगावी कोरोना टेस्ट घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.परंतु या टेस्टच्या घाईगडबडीत लसीकरण करायचा शासनाला विसर पडला आहे. यासाठी शासनाने पहिलं लसीकरण करा नंतर टेस्ट करावी असे निवेदन जिल्हा लसीकरण अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे फारुक देसाई.यांना बालिंगा गावचे सरपंच  मयूर जांभळे.  उपसरपंच पंकज कांबळे.व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे. यांनी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले होते.
  याची दखल घेऊन प्रशासनाने आज बालिंगा गावासाठी 150 लसीकरणाचे डोस उपलब्ध करून देण्यात आले.तसेच यापुढे आणखी  150 लसीकरणाचे डोस टप्याटप्याने मिळणार आहेत. अशी माहिती सरपंच मयूर जांभळे. व उपसरपंच पंकज कांबळे. यांनी दिली. यावेळी सरपंच म्हणाले बालिंगा गावची लोकसंख्या 10000 हजार इतकी आहे.पैकी आजअखेर 1100 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले होते .यामध्ये बहुतांश लोकांचा पहिला डोस झालेला नव्हता .याशिवाय दुसरा डोस घेण्यासाठी  गावातील नागरिक
ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार विचारणा होऊ लागली होती. तर लसीकरणाला वेळ शासनाकडूनचं होऊ लागला होता .त्यात तालुका स्तरावर अँटीजेन टेस्ट तसेच  आर. टी. पी. सी. आर. टेस्टची सक्ती केली जातं आहे.यामध्ये ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती झोकून काम करीत आहेत.बालिंगा गाव शहराशेजारी असल्यामुळे लोक जागरूक आहेत.जर दोन दिवसात लस उपलब्ध झाली नाहीतर ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थ यांनी गावात घेतल्या जाणाऱ्या सर्व टेस्ट बंद करण्यात याव्यात.  असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.याची आरोग्य विभागाने तात्काळ  दखल घेऊन लस उपलब्ध करून दिली. तात्काळ घेतलेली दखल व उपलब्ध करून दिलेली वय 45 वरील लोकांना 150 डोस यामुळे बालिंगा ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होतं आहे. बालिंगा गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व, सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत. यांनी प्रशासनाचे आभार मानले.

No comments