'पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजने'च्या लाभासाठी अर्ज करावेत
कोल्हापूर, दि.7 : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2021-22 अंतर्गत 'पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज 14 जुलैपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन पध्दतीने जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
नियंत्रित वातावरणात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारणी करून भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिने ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेस’ राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
स्वत:च्या मालकीची 0.40 हेक्टर जमीन असणारे व रोपवाटिका उभारण्यास कायमस्वरूपी पाण्याची सोय असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. जिल्हास्तरावर सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन रोपवाटिकांचा लक्षांक प्राप्त आहे. या योजनेंतर्गत महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य, महिला गट व महिला शेतकऱ्यांना व्दितीय प्राधान्य व भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. रोपवाटिकेचा प्रकल्प उभारणीचा खर्च 4.60 लाख असून 50 टक्के अनुदान देय आहे, असेही कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
00000
No comments