पाडळी खुर्द येथील गोपाळ समाजास अन्नधान्याचे वाटप . रिलायन्स फाऊंडेशन, सायबर महाविद्यालय व आसरा सामाजिक संस्थतर्फे स्तुत्य उपक्रम.
गोपाळ समाजाला अन्नधान्य वाटप करताना सर्व मान्यवर
बालिंगा :प्रतिनिधी.:- करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील गोपाळ समाजास अन्नधान्याचे वाटप . रिलायन्स फाऊंडेशन, सायबर महाविद्यालय व आसरा सामाजिक संस्थतर्फे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला .रिलायन्स फाऊंडेशन मार्फत कोविड च्या पार्श्वभूमीवर गरजू व्यक्ती व समूहांना मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून सायबर महाविद्यालय व वाशी येथील आसरा सामाजिक संस्थेच्या सहकार्याने करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असणाऱ्या गोपाळ समाजातील ५० हुन अधिक कुटुंबाना काही दिवस पुरेल इतके अन्नधान्य किटचे वितरण रिलायन्स फाऊंडेशन चे व्यवस्थापक श्री. मारुती खडके, सायबर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक भोसले, आसरा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णात पुजारी, ॲड. अश्विनी बाटे, विद्यार्थी प्रतिनिधी जॉन लोखंडे, जीवन आवळे भगवान रानगे बाळासो पवार व गोपाळ समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गोपाळ समाजाच्याथ वतीने रिलायन्स फाऊंडेशन च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना कोरोनाशी सामना करण्याबाबत यथोचित मार्गदर्शन केले.
.
No comments