कोल्हापूर नगररचना विभागामार्फत शुक्रवारी आयोजीत विशेष कॅम्प स्थगित
कोल्हापूर ता.14 : नगररचना विभागाकडून दि.5 मे 2021 पुर्वी सादर करण्यात आलेली बांधकाम परवानगी व भोगवटा संबंधाने सादर नस्तीवर परवानगीसाठी शुक्रवार दि.16 जुलै 2021 रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन हे दि.14 जुलै 2021 रोजी कोव्हीड पॉझीटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे नगररचना विभागाकडील उप-शहर रचनाकार व सर्व कनिष्ठ अभियंता हे त्याच्या संपर्कात आले असलेने हे सर्वजण होम आयसोलेशन झालेले आहेत. त्यामुळे शुक्रवार दि.16 जुलै 2021 रोजी आयोजीत करण्यात आलेला विशेष कॅम्प पुढे ढकलण्यात आलेला आहे. तरी संबंधीतांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन नगररचना विभागाकडून करण्यात आले आहे.
No comments