लोकनेते सदाशिवराव मंडलिक फौंडेशन व आयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून ५५० पुरग्रस्ताना आपत्कालीन सेवेचा प्रारंभ.
कोल्हापूर दिनांक 24: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. विशेषतः कोल्हापूर शहरातील विविध परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर निवारा केंद्रात करण्यात आले आहे. अशा स्थलांतरीत झालेल्या सुमारे ५५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने लोकनेते सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, ॲग्रीकल्चरल, एज्युकेशन अँन्ड कल्चरल डेव्लहपमेंट रिसर्च फौंडेशन व आयोध्या फाऊंडेशनच्या यांच्या सामाजीक बांधीलकीतून या पुरग्रस्त लोकांना सुविधा देण्याचा उपक्रम आजपासून सुरू केला असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे महापुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून प्रशासनाने वेळीच नदीकाठच्या नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. कोल्हापूर शहरात विविध भागात महापुराचे पाणी घुसल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या स्थलांतरीत झालेल्या नागरीकांना रोजचे जेवण, चहा, नाष्टा याची सोय व्हावी याकरीता एसडीएम फौंडेशन व आयोध्या फौंडेशन यांनी स्टेशन रोडवरील आयोध्या डेव्हलपर्सच्या इमारतीमध्ये सेंट्रल किचन सुरु केले असून याठिकाणाहून दररोज डॉ आंबेडकर विद्यालय - सिध्दार्थनगर, छत्रपती शाहू हायस्कूल, के.एम.सी. कॅालेज, डॅा. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय - उत्तरेश्वर पेठ , ज्ञानेश्वर भजनी मंडळ - उत्तरेश्वर पेठ, श्रमिक हॅाल - लक्ष्मिपुरी, चित्रदुर्ग मठ, लोणार शाळा, लोणार माळ - जकात नाका येथील स्थलांतरीत पुरग्रस्तांकरीता जेवण, नाष्टा व चहा पाठविला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात पुरपरिस्थिती बिकट झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन सोडून खासदार संजय मंडलिक आजरोजी कोल्हापूरात परतले.
कोरोना महामारी च्या काळात खासदार मंडलिक यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी चा निधी जमा करून अद्ययावत यंत्रणा ग्रामीण भागात पुरवली होती. आता त्यापुढे जाऊन महापुरामुळे संकटात आलेल्या अनेक कुटुंबांना आपत्कालीन सेवेचा लाभ देण्यासाठी खासदार मंडलिक यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
No comments