जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखालीराधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर, दि. 8 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.59 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. वारणा नदी- चिंचोली व माणगांव, कासारी नदी- यवलूज. दुधगंगा नदी- दत्तवाड असे एकूण 15 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये राधानगरी-232.59, तुळशी -92.14, वारणा -875.86, दूधगंगा – 626.30, कासारी- 61.25, कडवी -71.24(पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-62.85, पाटगाव 98.67, चिकोत्रा- 41.10, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65(पूर्ण क्षमतेने भरला), घटप्रभा - 44.17(पूर्ण क्षमतेने भरला), जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 21.5 फूट, सुर्वे 21.4, रुई 51, इचलकरंजी 49, तेरवाड 46.3, शिरोळ 38.6 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 40.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.
00000
No comments