Header Ads

Header ADS

पंचनाम्यांच्या यादीबाबत हरकत असल्यास 23 तारखेपर्यंत अर्ज सादर करा -प्र. जिल्हाधिकारी किशोर पवार

कोल्हापूर, दि.20 : जिल्ह्यातील पूर बाधित क्षेत्रात शेती पिकांचे वगळून अन्य नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेती पिकांचे पंचनामे वगळून उर्वरित नुकसानग्रस्त झालेले घर पडझड, गोठा पडझड, हस्तकला दुकानदार, टपरीधारक यांचे सर्व पंचनामे पूर्ण करून त्यांच्या याद्या संबंधित तलाठी कार्यालयात प्रसिद्ध केलेल्या आहेत. याबाबत कोणाची हरकत असल्यास संबंधितांनी 23 तारखेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी व तहसील कार्यालयामध्ये हरकतीचा अर्ज सादर करावा, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी केले आहे.
  0000

No comments