Header Ads

Header ADS

परिते जिल्हा परिषद मतदार संघात मंजुरी पत्राचे वाटप 450 हुन अधिक लाभार्थ्यांना लाभ

बालिंगा / प्रतिनिधी :- करवीर तालुक्यातील परीते जिल्हा परिषद मतदार संघातील पिरवाडी, वाशी, कांडगाव, देवाळे,कोथळी, बेले, म्हाळुंगे. येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याींना मंजूर पत्र  वाटप करण्यात आलीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील मोजक्यात लाभार्थ्यांना मंजूर पत्र  वाटप करण्यात आले…करवीरचे आमदार पी. एन. पाटील  युवा नेते  राजेशदादा पाटील, जि. प. अध्यक्ष राहुल पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरची संजय गांधी निराधार समिती कार्यरत आहे.शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यत पोहचविणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन समिती कार्य करत आहे.
 या योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघ मधील  450 हून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला आहे.करवीर विधानसभा मतदारसंघ मधील  गेले पाच वर्षापसून  संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मदत थांबवली होती. नव्यानं सत्तेवर आलेल्या महाअघाडी सरकारनं  पुन्हा ही योजना सुरु करुन जनतेला दिलासा दिला  आहे. करवीर मतदार संघाचे आमदार पी एन  पाटील यांच्या प्रयत्नातून अंध, अपंग, विधवा, परितक्त्या अशा 450  हून अधिक जणांना संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतून लाभ मिळवून दिला आहे.अश्या अनेक गावातील लाभार्थीना मंजुरीपत्र वाटप करण्यात आली आहेत. 
या कामात करवीर संजय गांधी समितीचे अध्यक्ष संदीप पाटील (कुर्डु) व सर्व सदस्यांचे सहकार्य व योगदान आहे.
  या मंजूर पत्र वाटपाच्या कार्यक्रमास करवीर संजय गांधी समितीचे अध्यक्ष संदीप पाटील कुर्डु,भोगावतीचे संचालक शिवाजी कारंडे.कृष्णात धोत्रे, स्वरूप पाटील महे सर्व गावातील प्रमुख,ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत  या योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचं वाटप करण्यात आलं

No comments