मुळचे कॉंग्रेसी असलेल्या संजय पवारांना आमचे आंदोलन ढोंगीपणा वाटणारच....!
कोल्हापूर दि31. राज्यातील तमाम मंदीरे भाविकांना खुली करावीत या करिता काल भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडे तशी मागणी आम्ही केली. असे असताना, केवळ प्रसिद्धीतुन आपले अस्तित्व दाखवून भाजपावर निशाणा साधला म्हणजे कुठ्ल्या तरी महामंडळावर वर्णी लावण्यासाठी ("दुरुण"लावण्यासाठी) हा त्यांचा आटापिटा आम्ही समजू शकतो. मंदीरे उघडा म्हणजे हिन्दुत्वाचा ढोंगीपणा असे वक्तव्य करणाऱ्यांनी जरा आपला इतिहास तपासून पहावा. युवक कॉंग्रेसचे बाळकडू प्यायलेल्यांनी आमचा हिन्दुत्ववाद बिल्कुल काढ़ु नये. आम्ही कधीच खिशात "टोपी" आणी गमछा" बाळगून फिरत नाही. आमच्या पक्षाचे नेते देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष होते पण, शासन नियम मोडून त्यानी कधीच कोणतीच गोष्ट केली नाही. आणि मागील आंदोलनाला ते उपस्थित सुद्धा नव्हते. तसेच, काल झालेल्या शंखनाद आंदोलनात ते असे म्हणाले की, जर शासनाने मंदीरे उघडण्यास परवानगी दिल्यास, शासनाचे सर्व कोरोनाचे नियम पाळु. तिकडे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन श्रद्धास्थाने खुली करु. आणि मागील वेळी विद्यमान अध्यक्ष असताना मंदीरे खुली केली तेव्हा अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या व प्रशासनास मदतच केली होती. त्यामुळे श्री.पवार यांनी आरोप करत असताना पुर्ण माहिती घेऊन बोलावे. अर्धवट माहितीच्या आधारे रेटून बोलायचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. हवेत बोलून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन आपला आणि आपल्या पक्षाचा पाणउतारा करून घेऊ नये. आपले हिंदुत्व किती कडवे आहे हे आम्ही मागील महापालिका निवडणुकीच्यावेळी पाहिले आहे. त्यामुळे शेखचिल्ली सारखी स्वप्नं पहाणे सोडून दयावे. पक्षीय आंदोलनाला नावे ठेवत आमचा हिंदुत्ववाद काढण्यापेक्षा आपले स्थान, आपली उंची, आपला धर्मसिध्दांत तपासून बघावा व विनाकारण आमच्या वाट्याला जाऊन आपले हसे करुन घेऊ नये. कारण, आमची "स्मरणशक्ती"प्रचंड तीव्र आहे. अन्यथा, समस्त कोल्हापूरकरांना साठा उत्तराच्या कहाण्या ऐकावयास लागतील.
No comments